पूर्णपणे ऑफलाइन · तुमचा डेटा तुमच्याच फोनवर

व्याजाचा हिशोब, आता वहीत नाही — फोनवर

कोणाला पैसे दिले, किती व्याज बाकी आहे, किती परत आले — सगळे एकाच ठिकाणी, तुमच्या फोनवर, इंटरनेटशिवाय. व्याज AsalBook आपोआप काढते.

डाउनलोड कराGoogle Play
AsalBook

व्याज कॅल्क्युलेटर, व्याजाची वही, उधारीचा हिशोब, हप्त्यांचा हिशोब किंवा गहाण नोंदवही — सगळे एकाच ॲपमध्ये, AsalBook मध्ये.

AsalBook मध्ये काय काय आहे

व्याज आपोआप

शेकडा दरमहा, वार्षिक % किंवा दरमहा ठरलेली रक्कम. दिवसांप्रमाणे, कॅलेंडर महिन्याप्रमाणे किंवा पूर्ण/अर्धा महिना धरा.

प्रत्येकाचे एक पान

किती दिले, किती परत आले, किती बाकी — एका नजरेत. एका टॅपवर फोन किंवा आठवण करून देणारा मेसेज.

हप्ते

रोजचे, आठवड्याचे किंवा महिन्याचे हप्ते. आजची वसुली होम स्क्रीनवर, थकलेले हप्ते स्पष्ट दिसतात.

गहाण सोने-चांदी

वस्तू, धातू, शुद्धता आणि वजन (ग्रॅम किंवा तोळा), फोटोसह. ठेवताना आणि परत देताना पावती.

WhatsApp वर हिशोब

प्रत्येकाचे स्टेटमेंट फोटो किंवा PDF मध्ये, पैसे मिळाल्याची पावती आणि आठवण मेसेज. तुम्ही पाठवल्यावरच जाते.

सुरक्षित आणि खाजगी

हिशोब तुमच्याच फोनवर, एन्क्रिप्ट केलेला, PIN किंवा फिंगरप्रिंटने उघडतो. स्वतःच्या Google Drive वर बॅकअप.

किंमत

45 दिवस सगळ्या सुविधा मोफत. त्यानंतर Google Play वरून दरमहा ₹59 किंवा वर्षाला ₹499. प्लॅन न घेतल्यास ॲप फक्त पाहण्यासाठी राहते — कोणतीही नोंद पुसली जात नाही.

प्रश्न-उत्तरे

AsalBook इंटरनेटशिवाय चालते का?

हो. सगळा हिशोब तुमच्या फोनवरच राहतो. इंटरनेट फक्त Google Drive बॅकअप आणि Google Play वरून प्लॅन घेण्यासाठी लागते.

व्याज कसे मोजले जाते?

शेकडा दरमहा, वार्षिक % किंवा ठरलेली रक्कम निवडा. परत आलेले पैसे आधी व्याजात, मग मुद्दलात जातात — किंवा तुम्ही निवडाल तसे.

नवीन फोनवर हिशोब कसा न्यायचा?

Google Drive बॅकअप सुरू ठेवा. नवीन फोनवर तेच Google खाते आणि तुमचा PIN वापरून सगळे परत आणा.

AsalBook पैसे कर्ज देते का?

नाही. AsalBook फक्त तुमचा हिशोब ठेवते. ते कर्ज देत नाही, मिळवून देत नाही आणि त्याची जाहिरातही करत नाही.

व्याजाचा हिशोब, आता वहीत नाही — फोनवर

पूर्णपणे ऑफलाइन · तुमचा डेटा तुमच्याच फोनवर

डाउनलोड कराGoogle Play